www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
तरुण-तरुणींना सिगरेटचे वेसन मोठ्याप्रमात लागले आहे. तरुण पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी २१ हून कमी वय असलेल्या तरुण-तरुणींना रविवारपासून सिगारेट खरेदी बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी न्यूयॉर्क प्रशासनाने घातली आहे.
लोकांमध्ये आरोग्य विषयक जाणीव वाढावी या उद्देशाने न्यूयॉर्क प्रशासनाने हे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग यांनी आपल्या दुसर्या कार्यकाळाच्या अखेरीस १९ नोव्हेंबर रोजी यासंदर्भातल्या कायद्यावर स्वाक्षरी केली होती. हा कायदा सहा महिन्यांनी अमलात आला आहे. यानुसार सिगारेट खरेदीचे किमान वय १८ वरून २१ करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे सिगरेट सेवन करणार्यांची संख्या निम्मी होईल, अशी आशा न्यूयॉर्क प्रशासनाला आहे. नोलिटा येथे वृत्तपत्र, सिगरेट, कँडी, कॉफी आणि केक विक्री दुकानांच्या प्रवेशद्वारावर २१ वर्षांखालील तरुण-तरुणींना सिगारेट निषेध, असा इशारा लिहिलेला दिसून येतो. तसेच सिगारेट विकत घेतेवेळी वयाचा पुरावा म्हणून वैध ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे, हा पुरावा सोबत नसल्यास सिगरेट विकत घेता येणार नाही.
मुले शाळेपासूनच सिगारेट ओढण्यास सुरुवात करणार नाहीत. यासाठी न्यूयॉर्क प्रशासनाचा हा कायदा तंबाखूजन्य अन्य पदार्थांसाठीही लागू आहे. २९ एप्रिलपासून रेस्टॉरंट, बार, उद्याने यासारख्या शहरातील सार्वजनिक ठिकाणी तसेच सागर किनार्यावर सिगारेट ओढण्यास बंदी आहे. काही खासगी निवासी वस्त्यांमध्येही ही बंदी लागू करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.