फ्रान्समध्ये समुद्रकिनारी सेल्फी काढण्यावर बंदी

समुद्रकिनारी गेल्यानंतर आपण सर्वजण आठवण म्हणून सेल्फीपासून ते सनसेटपर्यंत आवडीने अनेक फोट काढतो. पण दक्षिण फ्रांसच्या एक प्रसिद्ध समुद्रकिनारी 

Updated: Sep 9, 2014, 06:00 PM IST
फ्रान्समध्ये समुद्रकिनारी सेल्फी काढण्यावर बंदी title=

दक्षिण फ्रान्स: समुद्रकिनारी गेल्यानंतर आपण सर्वजण आठवण म्हणून सेल्फीपासून ते सनसेटपर्यंत आवडीने अनेक फोट काढतो. पण दक्षिण फ्रांसच्या एक प्रसिद्ध समुद्रकिनारी 

सुट्ट्यांमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी सेल्फी फोटो काय? पण सनसेटचे फोटो काढण्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

ही बंदी गॅरोप या समुद्रकिनाऱ्यावर लावण्यात आली आहे. या समुद्रकिनाऱ्याचे अधिकारी आणि स्थानिक मोबाईल नेटवर्कच्या मदतीनं इथं फोटो काढण्यावर घातली गेली आहे. काही 

ब्रिटिश पर्यटकांनी सोशल मीडियावर समुद्रकिनाऱ्यावरील प्रचंड फोटो पोस्ट केले होते. त्यामुळं समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढण्यावर बंदी लावण्यात आली आहे. 

ऐवढंच नव्हे तर इथं स्पेशल हॉलिडे स्पॅम पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत जेणेकरून कुणी या आदेशाचं उल्लंघन करणार नाही. म्हणून इथं पोलीस सतत पेट्रोलिंग करत 

असतात. याच हॉलिडे स्पॅम पोलिसांचे अनेक फोटो सोशल साइट्सवर पोस्ट केले जावू लागले, म्हणून कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं मोबाईल नेटवर्कच्या प्रवक्त्यानं सांगितलं. 

सुट्टयांमध्ये समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांची काही जबाबदारी असते. त्यांनी आपले चांगले फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले पाहिजेत, असंही ते म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.