नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलंय. टाईम्स मॅगझीनमध्ये छापून आलेल्या लेखात ओबामा यांनी मोदींचं कौतुक करत त्यांना भारताचा 'रिफॉर्मर इन चीफ' म्हटलंय.
मोदींचा भारताची गरीबी दूर करण्यावर जोर असल्याचं ओबामांनी यावेळी म्हटलंय. मोदींची अगोदर चहा विकून आपल्या कुटुंबाला पुढे जाण्यास मदत केली आता ते देशाला पुढे नेतायत असं म्हणतानाच, आता डिजिटल इंडियाद्वारे मोदी भारताला आधुनिकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं ओबामांनी म्हटलंय.
India’s Prime Minister @narendramodi “transcends the ancient and the modern,” writes President @BarackObama #TIME100 http://t.co/LehrpQSC10— TIME.com (@TIME) April 16, 2015
Dear @BarackObama your words are touching & inspiring. Thanks @TIME. http://t.co/igmK5moGxn— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2015
जगभरातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादीच्या निमित्तानं बराक ओबामांनी हे वक्तव्य केलंय. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लहानपणी मोदींनी चहा विकून आपल्या वडिलांना हातभार लावला... आज ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते आहेत. एक गरीब तरुण ते पंतप्रधान बनण्याचा त्यांचा हा प्रवास प्रगतीशील भारताचा जोश आणि क्षमतांचं प्रतिक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
जेव्हा ते अमेरिकेत आले होते, तेव्हा नरेंद्र आणि मी डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्या स्मारकाला भेट दिली होती. आम्ही गांधी आणि किंग यांच्या शिकवणींना उजाळा दिला होता. भारतात आता एक अरबहून अधिक भारतीय एकत्र राहत आहेत आणि प्रगती करत आहेत. हे संपूर्ण जगासाठीच प्रेरणादायी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.