लंडन : आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लंडनमध्ये घडली आहे. ३ महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीचा आईच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे.
अदकिन्स ही 32 वर्षीय महिला मद्यपान करुन आठवड्यापूर्वीच ओळख झालेल्या एका व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यात एवढी मग्न झाली की तिला आपलं 3 महिन्याचं बाळ आठवलंच नाही.
चिमुकली काही हालचाल करत नाही हे लक्षात येताच सकाळ ८ वाजता त्या चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
चिमुकलीला जन्म झाल्यापासूनच उलट्या होण्याचा त्रास सुरू होता. पण अदकिन्स ही खूपच निष्काळजी असल्याचं शेजाऱ्यांचं म्हणणं आहे.