चोरीला गेलेल्या 'त्या' दोन मूर्ती ऑस्ट्रेेलियाकडून भारताला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे पहिले विदेशी पाहुणे या नात्यानं आलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबॉट येताना एक अनमोल नजराणा घेऊन आलेत.

Updated: Sep 6, 2014, 10:45 AM IST
चोरीला गेलेल्या 'त्या' दोन मूर्ती ऑस्ट्रेेलियाकडून भारताला भेट title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे पहिले विदेशी पाहुणे या नात्यानं आलेले ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अॅबॉट येताना एक अनमोल नजराणा घेऊन आलेत.

अकराव्या शतकात तामिळनाडूमधून चोरीला गेलेल्या दोन दुर्मिळ मूर्ती त्यांनी आज पंतप्रधान मोदींना परत केल्या.

यातली एक मूर्ती नटराजाची आणि दुसरी अर्धनारीश्वराची आहे. ही नटराजाची ब्रान्झमध्ये घडवलेली मूर्ती अकराव्या ते बाराव्या शतकातील आहे. 2008 साली ‘नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया’नं ती 5.1 अब्ज अमेरिकन डॉलर्सना विकत घेतली.

तर अर्धनारीश्वराची मूर्ती 'न्यू साऊथ वेल्स म्युझियम'नं 2004 साली 2 लाख 81 हजार अमेरिकन डॉलर्सना विकत घेतली होती.

या दोन मूर्ती परत करून ऑस्ट्रेलियानं भारताला आपल्या मैत्रीची ग्वाही दिल्याचं अॅबॉट यांच्या कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.