अमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट

अमेरिकेत व्हाईट हाऊसबाहेर आज गोळीबार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. 

Updated: May 21, 2016, 06:42 PM IST
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, व्हाईट हाऊस टार्गेट title=

वॅाशिंग्टन : अमेरिकेत व्हाईट हाऊसबाहेर आज गोळीबार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. २० वर्षीय तरुणाने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसवर आज गोळीबार करत आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकी सैनिकांनी गोळीबार केला. हल्यानंतर व्हाईट हाऊस तातडीने बंद करण्यात आले होते.

ही घटना काल रात्री ३:०६ (स्थानिक वेळेनुसार) घडली. गोळीबारादरम्यान बराक ओबामा गोल्फ खेळत होते तर उपाध्यक्ष व्हाईट हाऊसमध्येच होते. या गोळीबारात कोणताही जवान जखमी झाला नाही. 

अमेरिकन राष्ट्रपतींचं निवासस्थान, व्हाईट हाऊसबाहेर हत्यार घेऊन आलेल्या व्यक्तीला गुप्तहेरांनी गोळी मारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला हत्यार खाली टाकण्यास सांगितलं. मात्र त्यानं आदेशाचं पालन केलं नाही. त्यानंतर सैनिकांनी या व्यक्तीला गोळी घालून ठार केलं. घटनेनंतर परिसराची नाकाबंदी करण्यात आली. पर्यटकांसाठी व्हाईट हाऊस बंद करण्यात आलंय तसंच तिथली सुरक्षा कमालीची वाढवण्यात आली आहे. 

हत्यारं घेऊन खुलेआम फिरणारे माथेफिरू ही अमेरिकेतली मोठी समस्या बनलीये. मार्च अखेरीस अमेरिकेचं संसदभवन असलेल्या कॅपिटॉलमध्ये एका व्यक्तीला हत्यारासह अटक करण्यात आली होती. व्हिजिटर्स सेंटरमध्ये लॅरी डॉसन नामक व्यक्तीनं सुरक्षा रक्षकावर पिस्तुल रोखलं होतं. यावेळी झालेल्या चकमकीत डॉसन जखमी झाला होता.