धनुष्यबाणाच्या ट्रिक झाल्या व्हायरल

 धनुष्यबाणाच्या साहय्याने ट्रिक करता येतील यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण या व्हिडिओतील तिरंदाजांनी जी काही कमाल केली आहे. ते पाहून तुम्हांला हा व्हिडिओ पाहिल्याचं समाधान मिळणार आहे. 

Updated: Nov 17, 2014, 06:59 PM IST
धनुष्यबाणाच्या ट्रिक झाल्या व्हायरल title=

मुंबई :  धनुष्यबाणाच्या साहय्याने ट्रिक करता येतील यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण या व्हिडिओतील तिरंदाजांनी जी काही कमाल केली आहे. ते पाहून तुम्हांला हा व्हिडिओ पाहिल्याचं समाधान मिळणार आहे. 

धनुष्य आणि बाणाच्या मदतीने तसेच आपल्या अचूक नेमामुळे या चार जणांनी     सहा मिनिटे जी धमाल केली ती तुम्ही पाहिली तर तुमच्या तोडूनही निघेल क्या बात.... क्या बात... क्या बात.... 

या व्हिडिओची सुरूवात एका बास्केट बॉल पोलवर दोरीने एक बास्केट बॉल बांधला आहे. ती दोरी तोडून तो बास्केट बॉल त्या बास्केटमध्ये टाकायचा आहे. सुमारे ५० मीटरवरून हा नेम मारण्यात आला आणि आश्चर्य म्हणजे ती दोरी त्या बाणाने तुटली आणि तो बॉल त्या बास्केटमध्ये पडला... हे वाचण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओ पाहा... 

असा व्हिडिओ जो तुम्ही कधीच पाहिला नाही... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.