नवी दिल्ली : इस्रायलची टीव्ही अँकर आपले अश्रू रोखू शकल नाही, जेव्हा तिला लाइव्ह शो सुरू असताना कळाले की हा तिचा अखेरचा शो आहे. आता यानंतर चॅनल बंद होणार आहे, याची ब्रेकिंग न्यूज तिने वाचली.
इस्रायलचे न्यूज चॅनल 'चॅनल १' चा अत्यंत लोकप्रिय इव्हिनिंग न्यूज प्रोग्रामचे ४९ वर्षांनंतर मंगळवारी अखेरचे प्रसारण झाले. हा न्यूज प्रोग्राम १९६८ मध्ये सुरू करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या शेवटच्या प्रसारणाची घोषणा करताना न्यूज अँकर गेला एवन हिला अश्रू अनावर झाले.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये अँकर गेला एवन म्हणाली, हे काय झाले, असे म्हणून ती रडायला लागली. मला समजत नाही मी काय बोलावे. अँकरिग करताना एक ब्रेकिंग न्यूज आली की संसदेत ठराव झाला असून त्यानुसार त्यांचे चॅनल बंद होणार आहे. त्यामुळे हा या रात्रीचा हा अखेरचा कार्यक्रम असेल.
कार्यक्रम सुरू असतानाच ही सूचना मिळाली. त्यामुळे सर्वांना धक्का बसला. त्यामुळे सायंकाळी अखेरच्या शोमध्ये कार्यक्रमातील सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी राष्ट्रगीत म्हटले.
रात्री चॅनल बंद करण्यापूर्वी चॅनलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन न्यूजरूममध्ये राष्ट्रगीत म्हटले. त्यावेळी अनेक लोक रडत होते.
इंग्रजी वेबसाईट डेली मेलनुसार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी राजकीय संघर्षानंतर अचानक राज्यात प्रसारित होणारे चॅनल बंद करण्याचा निर्णय घेतला. एका वक्तव्यात नेतन्याहू म्हणाली की शटडाऊन केल्याने नवीन संघटना बनविण्यात मदत होईल. दुसरीकडे चॅनलचे कर्मचारी आणि विरोधी पक्षाने त्यांच्यावर मीडियावर नियंत्रण करण्याचा आरोप केला आहे.