वॉशिंग्टन : पाच देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज स्वित्झर्लंडमधून अमेरिकेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी वॉशिंग्टनमधील ब्लेअर हाऊसला भेट दिली.
या भेटीत भारतातून तस्करी करून आणलेल्या 200 दुर्मिळ मूर्ती भारताला परत करण्यात आल्या. या मूर्तीला चेन्नईच्या शिलाँग मंदिरातून चोरण्यात आले होते.
या दुर्मिळ मूर्तींमध्ये ब्रांझच्या गणपती मूर्तींसोबतच जैन धर्मियांच्या बाहुबालीच्या मूर्तींचा समावेश आहे. यातील अनेक मूर्ती या दोन हजार वर्षे प्राचीन आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल अमेरिकन प्रशासन आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानले आहेत. मोदी म्हणाले की, ”काही या मूर्तींचे मूल्य पैशांच्या स्वरूपात मोजत असतील, मात्र आमच्यासाठी हा संस्कृतिचा अमूल्य ठेवा आहे.” या मूर्तींची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर भारताकडे त्याचे हस्तांतर होईल, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी सांगितले.
A focus on heritage & culture...I thank the US government for the return of precious cultural artefacts to India. pic.twitter.com/9mxjtEU527
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2016
Here are pictures of some of the artefacts. pic.twitter.com/Q4PWMOee2X
— Narendra Modi (@narendramodi) June 7, 2016