नवी दिल्ली : संपूर्ण जगासमोर आता पाकिस्तानची आणखीन एक पोल खोल झाली आहे. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने पसरवण्यात आलेलं खोटी माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानच्या पीएम कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या विधानानुसार ट्रम्प यांनी शरिफ हे विलक्षण व्यक्तिमत्व असून ट्रम्प हे पाकिस्तानातील प्रत्येक समस्या सोडवण्यास उत्सुक असल्याचं म्हटलंय. मात्र तिथेच ट्रम्प यांच्या टिमने हि सर्व माहीती खोटी असल्याचं सांगत पाकिस्तानचा खोटा चेहरा जगासमोर आणला आहे.