अलकायदाने मुंबई-पुणे हल्लाबाबत म्हटले, ‘जाबांज, मुबारक’ अभियान

पाकिस्तानमधील ऐबटाबादमध्ये ओसामा बिन लादेन याच्या राहत्या ठिकाणी काही अलकायदाचा दस्तऐवज सापडलाय. यामध्ये मुंबई हल्ला आणि पुणे हल्ल्याबाबत कौतुक करण्यात आले आहे. ही आमची चांगली कामगिरी असल्याचा उल्लेख अलकायदाच्या सापडलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे.

Reuters | Updated: May 21, 2015, 04:46 PM IST
अलकायदाने मुंबई-पुणे हल्लाबाबत म्हटले, ‘जाबांज, मुबारक’ अभियान  title=

वॉशिंग्टन : पाकिस्तानमधील ऐबटाबादमध्ये ओसामा बिन लादेन याच्या राहत्या ठिकाणी काही अलकायदाचा दस्तऐवज सापडलाय. यामध्ये मुंबई हल्ला आणि पुणे हल्ल्याबाबत कौतुक करण्यात आले आहे. ही आमची चांगली कामगिरी असल्याचा उल्लेख अलकायदाच्या सापडलेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट होत आहे.

2008मध्ये लश्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेच्या सदस्यांनी मुंबईत हल्ला केला. या हल्ल्याला 'जाबांज फिदाई' आणि पुण्यातील जर्मन बेकरी हल्ल्याचा उल्लेख 'शानदार बडा' धमाका असा केला आहे.

15पानी कागदपत्रांचा ऐवज सापडलाय. हा ऐवज इंग्रजीमध्ये आहे. यामध्ये मुंबईवरील हल्ल्याबाबत मुबारक अभियान म्हटले आहे. तसेच याऐवजामध्ये म्हटले आहे की, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि भारतसहीत अमेरिकेशी संबंधीत देशांवर अतिरेकी हल्ले केले पाहिजेत. यात त्या त्या देशांचे लोक मारले गेले पाहिजेत.

ग्लोबल मुजाहिद्दीनच्या मिशन वैश्विक स्तरावर अमेरिकेच्या आर्थिक केंद्रावर लक्ष्य केले पाहिजे. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली पाहिजे. लंडनमध्ये स्फोट करावेत. त्याआधी इंडोनेशिया, पाकिस्तान, रशिया, भारत आणि दुसऱ्या स्थानांवर अमेरिका आणि युरोपीय ठिकाणांना निशाणा केला पाहिजे. याठिकाणी मुबारक अभियान सुरु केले पाहिजे.

इस्लामाबादमध्ये फ्रान्स नागरिकांना घेऊन जाणाऱ्या बसवर केलेला हल्ला, डेन्मार्क दुतावासात केलेला स्फोट, बाली हल्ला तसेच भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर केलेला हल्ला हा आमच्या अभियानाचा भाग असल्याचा उल्लेख सापडलेल्या कागदपत्रातून दिसत आहे.

अमेरिका गुप्तचर अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, हा दस्तऐवज अरबी भाषेत आहे. त्याचा इंग्रजी अनुवाद करण्यात आलाय. अलकायदा पाकिस्तान गुप्तचर एजन्सीच्या विरोधात दिसत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.