इंडोनेशियामध्ये एअर एशियाचं विमान बेपत्ता, १६२ प्रवाशांचा जीव धोक्यात

एअर एशियाचं विमान QZ 8501 बेपत्ता झालंय. १६२ प्रवासी असलेलं हे विमान इंडोनेशियामधून सिंगापूरला जात होतं. सकाळी ७.२४ला विमान बेपत्ता झाल्याचं एअर एशियानं सांगितलंय. 

Reuters | Updated: Dec 28, 2014, 03:34 PM IST
इंडोनेशियामध्ये एअर एशियाचं विमान बेपत्ता, १६२ प्रवाशांचा जीव धोक्यात title=

जकार्ता: एअर एशियाचं विमान  QZ ८५०१ बेपत्ता झालंय. १६२  प्रवासी असलेलं हे विमान इंडोनेशियामधून सिंगापूरला जात होतं. सकाळी ७.२४ला विमान बेपत्ता झाल्याचं एअर एशियानं सांगितलंय. 

एअर एशियाचं विमान एअरबस A३२०-२०० सकाळी ७.२४ मिनिटांनी संपर्क क्षेत्रातून बाहेर पडलं. सकाळी ८.३०ला हे फ्लाइट सिंगापूरला पोहोचायचं होतं. 

इंडोनेशियातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आज सकाळी पाचच्या सुमारास एअर एशियाचे QZ ८५०१ हे विमान सिंगापूरच्या दिशेनं रवाना झालं. मात्र उड्डाणाच्या तासाभरानंतर विमानाचा जकार्ता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमान नियमित मार्गानेच सिंगापूरला जात होतं, असं जकार्ता हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. या विमानाशी पुन्हा संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

AirAsia Indonesia regrets to confirm that QZ8501 from Surabaya to Singapore has lost contact at 07:24hrs this morning http://t.co/WomRQuzcPO

— AirAsia (@AirAsia) December 28, 2014

 

सकाळीच एअर एशियानं ट्विटकरून घटनेबद्दलची सतत्या मांडलीय. फेसबुकवरही एअर एशियानं मॅसेज टाकलाय. विमानातील प्रवासी आणि क्रू मेंबरकडून पुढे कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं त्यात सांगण्यात आलंय. तसंच एक इमर्जन्सी कॉल सेंटर सुरू करण्यात आलं असून, त्यावर एअर लाईन्सकडून प्रवाशांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना माहिती देण्यात येणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क - +622129850801 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.