ब्रिटन : एका अभिनेत्याच्या वक्तव्याने अनेक दिग्गज नेत्यांचे डोळे उंचावले जेव्हा त्याने म्हटलं की त्याचे एका कॅबिनेट मंत्र्यांच्या मुलीसोबत संबंध होते. हा अभिनेत्याला एड्स या रोगाची लागण झाली आहे. चार्ली शीन या हॉलिवूड अभिनेत्याला आज अनेक जण ओळखतात. चार्ली शीनने म्हटलं की, तो एड्स पीडित आहे. असं असतांना देखील त्याने एका ब्रिटेनच्या एका कॅबिनेट मंत्रीच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. चार्लीने म्हटलं की तो त्याच्या पार्टनरला कधीच सांगत नसे की तो एड्स पीडित आहे. पण तो या गोष्टीची काळजी घ्यायचा की याची लागण कोणाला होऊ नये. मागच्या वर्षी जेव्हा चार्ली शीनने तो एचआयव्ही पीडित असल्याचं सांगितलं तेव्हा मोठा वाद निर्माण झाला होता.
चार्ली शीनने एका शोमध्ये म्हटलं की 'तो २० वर्षापूर्वी एका तरुणीला भेटला होता. मी हे नाही सांगू शकत की ती फेमस आहे पण तिचे पिता हे फेमस आहेत. आमची भेट एअरपोर्ट ते संसदभवन दरम्यान झाली.' शोमध्ये त्याने या तरुणीचं नाव नाही घेतलं पण शेवटी त्याने हे सांगितलं की तिचे पिता कॅबिनेट मंत्री होते. यानंतर देशात चर्चांना उधाण आलं.