नवी दिल्ली : चीनलगत 4,057 किलोमीटर लांब सीमेवर ‘चीनी ड्रॅगन’च्या हरकतींशी निपटण्यासाठी भारतानं आपल्या सैन्य ताकद वाढवण्याच्या योजनेवर काम सुरु केलंय.
नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) चीनकडून वारंवार सैन्य ताकद वाढवण्याचा आणि सीमा उल्लंघन करण्याचा प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे, भारतानं पूर्वेत्तर भागांत जमीनीवरून हवेत मारा करणाऱ्या सहा आकाश मिसाईल तैनात करण्याची योजना आखलीय.
आकाश मिसाईलच्या सहाय्यानं लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि ड्रोननं होणाऱ्या कोणत्याही पद्धतीच्या हल्लांना उत्तर देणं भारताला शक्य होणार आहे. यापूर्वी, भारतीय वायुसेनंनं तेजपूर, चबुआ आणि बरेलीमध्ये सुखोई-30 एमकेआय लडाऊ विमानं तैनात केले होते.
वायुसेनेनं लडाखच्या न्योमा आणि दौलत बेग ओल्डीमध्ये विमान आणि हेलिकॉप्टर्स लँड करण्यासाठी अॅडव्हान्स लँन्डिंग ग्राऊंड (एएलजी)चा विकास केलाय. भारत-चीन-म्यानमारच्या सीमेवर असलेल्या विजयनगरमध्येही एएलजीचा विकास केला गेलाय. याशिवाय पासीघाट, मेचुका, वेलाँग, टुटिंग आणि झीरो यांसारख्या भागांमध्येही एएलजीचा विकास सुरू आहे.
भारताकडून आपली सैनिकी ताकद वाढवण्यासाठी 5,000 किलोमीटरपर्यंत मारा करणारी अग्नी-5 इंटर कॉन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईलचा विकासही सुरु आहे. या मिसाईलच्या साहाय्यानं चीनलगतच्या भारत सीमेवरून चीनच्या कोणत्याही भागावर हल्ला केला जाऊ शकतो.
एव्हढंच नाही तर जमीनीवर कोणत्याही पद्धतीच्या चीनी हरकतींना उत्तर देण्यासाठी भारतीय सेनेने 64,678 करोड रुपये खर्च करून माऊंटन स्ट्राइक कॉर्प्सचाही विकास सुरु केलाय. यामध्ये 90 हजार सैनिक सहभागी होऊ शकतील. या जवानांची 2018-19 पर्यंत होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.