ढाका : भारतीय गाण्यांच्या रिंगटोन्स तसेच कॉलरट्यूनवर बंदी घालण्याचा निर्णय ढाकातील उच्च न्यायालयानं सुनावलाय. यामुळे बांग्लादेशमध्ये यापुढे बॉलिवूडच्या गाण्यांच्या रिगटोन्स ऐकू येणार नाहीत.
बांग्लादेशमध्ये भारतीय चित्रपटांच्या आयातीवर आधीपासूनच बंदी जाहीर करण्यात आलीय... याच धर्तीवर ढाका न्यायालयात भारतीय गाण्यांच्या रिंगटोन्सवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायालयानं या याचिकेला हिरवा कंदील दाखवत भारतीय गाण्यांची रिंगटोन्स तसेच कॉलरट्यून्सला मनाई करण्यात आलीय. भारतीय चित्रपटांप्रमाणे भारतीय गाण्यांचीही बांग्लादेशमध्ये मोठी मागणी होती.
त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाचा फटका बांग्लादेशमधील अनेक मोबाईल ग्राहकांना बसणार, यात शंका नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.