लंडन : हसताहसता एका महिलेने चक्क बाळाला जन्म दिल्याची अजबगजब घटना समोर आलीय. लंडनच्या प्लॉय माउथ शहरातील रॉयल लास्ट थिएटरमध्ये एका कॉमेडी शोदरम्यान एक महिला इतकी जोरात हसली की ज्यामुळे तिला प्रसूतीवेदना सुरु झाल्या आणि तिने दोन महिने आधीच बाळाला जन्म दिला.
क्रिस्टी असं या महिलेचं नाव आहे. क्रिस्टी ख्रिसमस सणानिमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम पाहत होता. या शोमध्ये कॉमेडी पाहताना तिला काही हसू आवरले नाही. सतत आणि जोरात हसण्यामुळे तिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर तिला तातडीने डेरिफोर्ड रुग्णालयात दाखल केले.
येथे क्रिस्टीने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे क्रिस्टीची प्रसूतीची तारीख दोन महिन्यांनी होती. मात्र त्यापूर्वीच तिने बाळाला जन्म दिला. दाम्पत्याने या बाळाचे नाव रुबेन असं ठेवलंय.