वडिलांना सुट्टी द्या, चिमुकलीनं गूगलला लिहीलं पत्र...

सध्या ख्रिसमस डे जवळ आला नाहीय. तरी एका चिमुकलीला सांताक्लॉजकडून गिफ्ट मिळालंय. तिच्यासाठी सांताक्लॉज ठरलीय गूगल कंपनी. तिचं नाव आहे कॅटी...

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 22, 2014, 08:39 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
सध्या ख्रिसमस डे जवळ आला नाहीय. तरी एका चिमुकलीला सांताक्लॉजकडून गिफ्ट मिळालंय. तिच्यासाठी सांताक्लॉज ठरलीय गूगल कंपनी. तिचं नाव आहे कॅटी...
त्याचं घडलं असं कॅटीचे वडील गूगलमध्ये नोकरीला आहेत. गूगलचे डिझायनर म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांना केवळ शनिवारीच सुट्टी मिळते. म्हणून त्यांच्या चिमुरडी कॅटीनं गूगलला चक्क पत्र लिहीलं. या पत्रात तिनं आपल्या वडिलांचा वाढदिवस उन्हाळ्यातच असल्याचं लिहीलंय आणि त्यासाठी त्यांना सुट्टी देण्याची विनंती केलीय.
कॅटीच्या पत्रानंतर गूगलनं चक्क तिला उत्तर दिलंय आणि एक दोन नाही तर जुलैचा पहिला अख्खा आठवडा तिच्या बाबांना सुट्टी दिलीय.
एकूणच काय ख्रिसमस पूर्वी कॅटीला गिफ्ट मिळालंय. विशेष म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेत त्यांच्या मुलांच्या मनाचा आदर करत गूगलनं तिच्या पत्राला उत्तर दिलं, ही मोठी गोष्ट आहे.

काय लिहिलं पत्र कॅटीनं पाहा
Dear Google Workers,
Can you please make sure when daddy gets to work, he gets one day off. Like he can get a day off on Wednesday. Because daddy ONLY gets a day off on Saturday.
From Katie.
PS. It is daddy`s BIRTHDAY!
PPS. It is summer, you know
(Photo Courtesy – Imgur)

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.