लंडन : ब्रिटनच्या वेस्ट सस्सेक्स शहरात एका हॉस्पिटलने चक्क ९९ वर्षाच्या महिलेला गरोदर ठरवलं, आणि तिला डिलिवरीसाठी तारीखही देण्यात आली आहे.
डोरिस इंग या महिलेला हॉस्पिटलमधून एक पत्र मिळाले, ज्यात त्यांना डिलिवरीची तारीख देऊन, त्या तारखेला हॉस्पिटलमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे.
फोरम कम्युनिटी हॉस्पिटलने या महिलेच्या नावासकट तिची जन्मतारीखही त्या पत्रात लिहिली होती. इंग यांना या नोव्हेंबरमध्ये १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यांना तीन मुले आणि १३ नातवंडे आहेत.
या घटनेमुळे मी चकित झाले आहे. मी या हॉस्पिटलमध्ये कधीचं गेले नाही, मला हे पत्र कसे काय मिळाले ते एक गुपितचं आहे, असे डोरिस इंग यांनी स्थानिक वृत्तपत्राला सांगितले आहे.
हे पत्र चुकून इंग यांना गेल्याचे हॉस्पिटलच्या प्रशासनाचे सांगितले आहे. याबाबत त्यांनी माफीही मागितली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.