नवी दिल्ली : जगामध्ये असे अनेक लोक आहेत जे काही तरी वेगळं करुन जातात. पण असे ही काही लोक आहेत जे आपल्याला कधी अपेक्षित नसतं किंवा खरं वाटत नाही असं ही काहीतरी करुन जातात.
आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत ज्याने तारुण्यात अनेक महिलांसोबत शारिरीक संबंध ठेवले आणि आज त्याला हजार हून अधिक संतान आहेत.
एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ८७ वर्षिय हा व्यक्ती एक पोस्टमन होता. या व्यक्तीला एकूण १३०० मुलं आहेत. ही गोष्ट तेव्हा प्रकाशात आली जेव्हा एका परिवाराने आपला खरा पिता कोण यासाठी एका गुप्तहेरची मदत घेतली आणि बायोलॉजिकल फादर चा शोध सुरू केला.
१५ वर्षानंतर डीएनए सॅंपल आणि काही साक्षीदारांच्या मदतीने ही गोष्ट जगासमोर आली. या व्यक्तीचं म्हणणं आहे की मी असं काहीही केलेलं नाही. त्याने त्याच्या वेगळ्यापणामुळे अनेक महिलांशी संबंध ठेवले होते असं त्यांनी म्हटलं आहे.
गुप्तहेर सिड रॉय याने डीएनएच्या माध्यमातून हे सिद्ध केली आहे. या व्यक्तीचे आणखी काही मुलं असू शकतात असं देखील याने दावा केला आहे.