अंदमान-निकोबारला भूकंपाचा धक्का; त्सुनामीची शक्यता

नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या भूकंपानंतर तिथल्या आपदग्रस्तांना नीटशी मदतही पोहचलेली नसतानाच आज दुपारी अंदमान बेटाला भूकंपाचा धक्का बसलाय.

Updated: May 1, 2015, 06:09 PM IST
अंदमान-निकोबारला भूकंपाचा धक्का; त्सुनामीची शक्यता title=

अंदमान : नेपाळला उद्ध्वस्त करणाऱ्या भूकंपानंतर तिथल्या आपदग्रस्तांना नीटशी मदतही पोहचलेली नसतानाच आज दुपारी अंदमान बेटाला भूकंपाचा धक्का बसलाय.

 अंदमान बेटावर आज दुपारी २ वाजू २९ मिनिटांनी मध्यम तीव्रतेचा धक्का बसला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. ५.४ रिश्टर स्केलचा हा धक्का होता. हा भूकंप जमीनीखाली १० किलोमीटरवर बसल्याचं आयएमडीनं सांगितलंय. परंतु या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, भारताच्या दक्षिण-पूर्व येथे स्थित पाण्यानं वेढलेल्या  'पापुआ न्यू गिनी' या देशालाही काल म्हणजेच गुरुवारी आणि आजहीला भूकंपाचा धक्का बसलाय. कालच्या भूकंपाची तीव्रता ६.७ रिश्टर स्केल तर आजच्या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल आहे. भूकंपाचे केंद्र पापुआ न्यू गिनीची राजधानी कोकोपोपासून १११ किमी अंतरावर असल्याची माहिती आहे. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने भूकंपाच्या केंद्रापासून २९९ किमी अंतरापर्यंत त्सुनामीची चेतावणी दिली आहे. 'पापुआ न्यू गिनी'त वारंवार भूकंप येत असतात. ७० लाख लोकसंख्येचा हा देश  आहे. 

गेल्या शनिवारीच नेपाळमध्ये ७.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यात आतापर्यंत ६ हजार लोकांनी आपले प्राण गमवले आहेत. हा आकडा १५ हजारांवर जाण्याची शक्यता नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी वर्तवली आहे. नेपाळच्या या भूकंपानंतर एका आठवड्याच्या आताच हा भूकंपाचा धक्का जाणवलाय. गेल्या शनिवारी भारतासहीत नेपाळच्या जवळच्या अनेक भागांत भूकंपाचे धक्के बसले होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.