कोंगो : दक्षिण आफ्रिकेत दहशतवाद्यांनी १३१ हत्तीची शिकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मध्य आफ्रिकेमध्ये हत्तींची शिकार करणे हा मोठा गुन्हा असूनदेखील अत्याधुनिक तंत्रांचा वापर करत अज्ञात शिकाऱ्यांनी गेल्या ११ महिन्यात एकूण १३१ हत्तींची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे.
हस्तीदंताकरिता करण्यात आलेली ही शिकार अतिरेक्यांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
आफ्रिकेतील कोगों येथील गारांबा राष्ट्रीय उद्यानात एप्रिल २०१४ पासून १३१ हत्तींची शिकार करण्यात आल्याचे अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटले आहे.
शिकार केलेल्या हत्तींचे दातांना चीनमधील काळ्या बाजारात मोठी किंमत मिळते. यापूर्वी करण्यात आलेल्या शिकारींमध्ये शिकाऱ्यांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान नसल्याने एकावेळी केवळ एक किंवा दोनच हत्तींची शिकार करण्यात येत होती.
मात्र गेल्या काही दिवसांत केलेल्या शिकारीत एकाच वेळी आठ हत्तींना ठार करण्यात आले होते, असे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तसमूहाने दिले आहे. शिकारीसाठी शिकाऱ्यांनी हेलिकॅप्टरचा तसेच अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केल्याची आढळून आले आहे. हा सर्व प्रकार अतिरेकी संघटनांनी केल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.