रश्दी नेमाडेंवर खेकसले, 'ये तापट म्हाताऱ्या...!'

भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, बुकरसह खंडीभर पुरस्कार पटकावणारे सलमान रश्दी यांच्या पचनी पडलेली दिसत नाही. कारण भालचंद्र नेमाडेंवर बुकर विजेते सलमान रश्दी यांनी ट्विटरवरुन टीका केलीय.

Updated: Feb 8, 2015, 11:25 AM IST
रश्दी नेमाडेंवर खेकसले, 'ये तापट म्हाताऱ्या...!' title=

मुंबई : भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला, बुकरसह खंडीभर पुरस्कार पटकावणारे सलमान रश्दी यांच्या पचनी पडलेली दिसत नाही. कारण भालचंद्र नेमाडेंवर बुकर विजेते सलमान रश्दी यांनी ट्विटरवरुन टीका केलीय.

ज्ञानपीठ जाहीर झाल्यानंतर नेमाडेंनी मुंबईत केलेल्या भाषणात सलमान रश्दींवर भाष्य केले होते, रश्दी आणि व्ही एस नायपॉल यांचं साहित्य फार काही ग्रेट नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावर रश्दी अतिशय अर्वाच्य भाषेत ट्ववीटरवरून नेमाडेंवर खेकसले आहेत.

'अशा तापट म्हाताऱ्याने, मुकाट राहून पुरस्कार स्वीकारुन आभार मानावेत', अशा भाषेत रश्दी नेमाडेंवर खेकसले आहेत. नेमाडेंनी ज्या लेखनावर टीकास्त्र सोडलं आहे, ते त्यांनी वाचलं आहे की नाही याबाबतही मला शंका वाटते, असंही रश्दी म्हणतात.

रश्दी यांनी ही टीका नेमाडे यांच्यावरच केल्याचं त्यांनी ट्वीटरला खाली दिलेल्या लिंकवरून स्पष्ट होतंय. भालचंद्र नेमाडे हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते, तरी देखिल भालचंद्र नेमाडेंनी भाषणात इंग्रजी ही मारक असल्याचं म्हटलं होतं.

भारतात शिक्षणक्षेत्रात इंग्रजी भाषेवर बंदीचीही मागणी केली होती. तसंच रश्दी आणि व्ही. एस. नायपॉल यांच्या लेखनावर टीकास्त्र सोडलं होतं. यात त्यांनी रश्दी आणि व्ही एस नायपॉल यांचं साहित्य फार काही ग्रेट नसल्याचं म्हटलं होतं.

सलमान रश्दी यांचं ट्वीट

Grumpy old bastard. Just take your prize and say thank you nicely. I doubt you've even read the work you attack. http://t.co/TavuYkxe2u

— Salman Rushdie (@SalmanRushdie) February 6, 2015

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.