म्यानमारमध्ये निवडणुका, स्यु कींच्या विजयाची शक्यता

म्यानमारमध्ये रविवारी निवडणुका संपन्न झाल्या. म्यानमारमध्ये लोकशाही राजवट प्रस्थापित व्हावी यासाठी गेली काही दशके आँग सान स्यु की लष्करी हुकुमशहांशी लढा देत आहेत. आँग सान स्यु की पहिल्यांदाच संसदेत प्रवेश करतील अशी चिन्हं आहेत.

Updated: Apr 1, 2012, 11:44 AM IST

www.24taas.com, म्यानमार

म्यानमारमध्ये रविवारी निवडणुका संपन्न झाल्या. म्यानमारमध्ये लोकशाही राजवट प्रस्थापित व्हावी यासाठी गेली काही दशके आँग सान स्यु की लष्करी हुकुमशहांशी  लढा देत आहेत. आँग सान स्यु की पहिल्यांदाच संसदेत प्रवेश करतील अशी चिन्हं आहेत.

म्यानमारच्या संसदेत रिक्त असलेल्या काही डझन जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात आश्चर्यकारक बदल आणि सुधारणा म्यामनारमध्ये झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने घातलेल्या निर्बंधांमुळे म्यानमारची अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली आहे. आँग सान स्यु की आणि त्यांचे सहयोगी विरोधी पक्षांनी जरी या पोटनिवडणुकीत विजय मिळवला तरी ६६४ सदस्य असलेल्या संसदेत लष्कर आणि लष्काराचे पाठबळ असलेल्या सत्ताधारी पक्षाचेच वर्चस्व कायम राहणार आहे.

आँग सान स्यु की या गेली पंचवीस वर्षे नजरकैदत होत्या. स्यु की यांच्या विजयामुळे म्यानमार इतिहासात लोकशाहीच्या दिशेने वाटचालीचा प्रतिकात्मकरित्या महत्वाचा टप्पा ठरणार आहे. स्यु की यांच्या विजायमुळे पाश्चिमात्य देशांनी म्यानमारवर लादलेले निर्बंध काही प्रमाणात सैल होण्याची अपेक्ष आहे. स्यु की यांच्या विरोधात लष्कारातील माजी डॉक्टर राहिलेले सोय विन निवडणुक लढवत आहेत.