www.24taas.com, नवी दिल्ली
मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हफीज सईद याला भारताच्या ताब्यात दिल्यास पाकिस्तानला ५५ कोटी रुपये म्हणजेच १ कोटी डॉलर देण्याची तयारी भारताने दर्शविली आहे.
हफीज सईद हा लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दवा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा म्होरक्या आणि पाकिस्तानात गेल्या आठवड्यात भारत आणि पाकच्या गृहसचिवांच्या बैठकीदरम्यान पाकिस्तानच्या एका पत्रकाराने उपहासाने विचारलेल्या प्रश्नावर भारताचे गृहसचिव आर. के. सिंग यांनी तसे सांगितले.
हफीज सईदविरोधात पुरावे देण्यासाठी अमेरिकेने ५५ कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. भारत हफीजला ताब्यात देण्याची मागणी करीत असताना हे बक्षीस आपल्या खिशातून देणार काय, असा प्रश्न गृहसचिव सिंग यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी बोलताना सिंग यांनी पाकिस्तानने ५५ कोटी घेऊन जर हफीजला आमच्या ताब्यात दिले तर आनंदच होईल, असे सडेतोड उत्तर देत पाकिस्तानी पत्रकाराची भंबेरी उडविली.