www.24taas.com, इस्लामाबाद
दहशतवादावर चर्चा करताना पाकिस्ताननं पुन्हा त्यांची आडमुठी भूमिका काय़म ठेवली आहे. २६ /११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात नसल्याचा पवित्रा पाकिस्ताननं घेतला आहे.
भारत- पाक परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चेत पाकिस्ताननं हे स्पष्ट केलं आहे. मुंबई हल्ल्यात पाकिस्तानी नागरिकांचा हात असल्यास, संयुक्त चौकशीसाठी तयार असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी सांगितलं. अबू जिंदालवरही थेट बोलण्यास पाकिस्ताननं नकार दिला आहे.
भारत- पाकिस्तान क्रिकेटबाबतचा निर्णय दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड घेतील असंही ते म्हणाले. परराष्ट्र सचिव पातळीवरच्या बैठकीत काश्मीर मुद्यावरही सकारात्मक चर्चा झाल्याचं दोन्ही बाजुने सांगण्यात आलं आहे. तर दोन्ही देशांच्या विदेश सचिवांची पुढची बैठक सप्टेंबरमध्ये इस्लामाबादमध्ये होईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.