भारतीय मच्छीमारांवर हल्ला

श्रीलंकेच्या नौसेनेने समुद्रात मासेमारी करत असलेल्या भारतीय मच्छीमारांवर आज हल्ला चढवला.

Updated: Nov 17, 2011, 11:47 AM IST

झी २४ तास वेब टीम, हैदराबाद

 

श्रीलंकेच्या नौसेनेने समुद्रात मासेमारी करत असलेल्या भारतीय मच्छीमारांवर आज  हल्ला चढवला. याबाबतची तक्रार मच्छीमारांनी तटरक्षक दलाकडे केली आहे.

 

भारतीय मच्छीमारांना श्रीलंकेच्या नौसेनेने आपले लक्ष्य बनवले आहे. गेल्या पंधरा दिवसात घडलेली ही चौथी घटना आहे. बुधवारी  सकाळी मासेमारीच्या उद्देशाने रामेश्वरममधील मच्छीमार एकूण ६९७ बोटींमध्ये बसून समुद्रात गेले. ते  काचाथीवू बेटाजवळ मासेमारीकरिता जाळे टाकलेले असताना, श्रीलंकेच्या नौसेनेच्या बोटींनी या मच्छीमारांना गराडा घातला.  त्यानंतर त्यांच्यावर दगड आणि बाटल्या फेकून मारण्यास सुरुवात केली.

 

नौसेनेतील लोकांनी या मच्छीमारांनी पाण्यात टाकलेली जाळी उध्वस्त केली तसेच त्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्यावर गोळ्या चालवण्यासही ते मागे पुढे बघणार नाहीत, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे रामेश्वरममधील मच्छीमार घाबरलेले  आहेत.