www.24taas.com, जकार्ता
इंडोनेशियामध्ये बुधवारी बेपत्ता झालेले रशियाचं सुखोई विमानाचे अवशेष शोधपथकाला सापडलेत. शोधपथकानं पहाडांवर 5 हजार पाचशे फूट उंचीवर विमानाचे अवशेष दिसून आलेत.
मात्र अजूनही शोधपथक याठिकाणी पोहचू शकलेलं नाही. त्यामुळे जवळपास 50 जणांना घेऊन गेलेल्या या विमानात किती जण सुरक्षित आहेत ते कळू शकलेलं नाही. इंडोनेशियामध्ये एअर शोच्या दरम्यान रशियाचं सुखोई सुपरजेट विमान बेपत्ता झालं होतं. या विमानात राजकारणी व्यक्ती आणि पत्रकारांसह 46 व्यक्ती प्रवास करत होत्या.
पूर्व जाकार्तामधील हलीम पेरडानाकुसुमा विमानतळावरून या विमानाने स्थानिक वेळेनुसार दुपारी दोन वाजता उड्डाण केले. त्यानंतर बोगोर भागात असताना ते अचानक रडारवरून नाहीसे झाले होते.