बेनझीरांच्या हत्येत मी नाही - मुशर्रफ

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमध्ये आपला सहभाग नसल्याची प्रक्रिया माजी लष्कराधिकारी परवेझ मुशर्रफ यांनी दिली आहे.

Updated: Feb 23, 2012, 04:11 PM IST

www.24taas.com, इस्लामाबाद

 

 

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या हत्येमध्ये आपला सहभाग नसल्याची प्रक्रिया माजी लष्कराधिकारी परवेझ मुशर्रफ यांनी  दिली आहे.

 

 

परवेझ मुशर्रफ यांचा हात असल्याचे आरोप  करण्यात आला होता.  मुशर्रफ यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत. दरम्यान, बेनझीर यांना कोणी मारले याची माहिती त्यांचे पती आणि पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांना असल्याचाही दावा मुशर्रफ यांनी दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना केला आहे. सध्या लंडनमध्ये निर्वासित म्हणून परवेझ मुशर्रफ राहत आहेत.

 

 

बेनझीर भुट्टो यांच्यावर भर रस्त्यात हल्ला करण्यात आला होता. रावळपिंडी येथे २७  डिसेंबर २००७  रोजी बेनझीर भुट्टो यांची हत्या तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. बिलाल आणि इकरमुल्लाह या हल्लेखोरांनी भुट्टोंची हत्या केली. बिलालने स्वत:ला उडवले आणि स्फोटानंतर इकरमुल्लाह पळून गेला. या प्रकरणाचे साक्षीदार असलेल्या भुट्टोचे माजी सुरक्षा अधिकारी मेजर इम्तियाज हुसेन यांच्यासह १२४ जणांची चौकशी करण्यात आल्याचे एफआयए (फेडरल इन्विस्टिगेशन एजन्सी)च्या अहवालात म्हटले आहे.