पाक स्फोटात १५ ठार

पाकिस्तानातील क्वेटा शहरामध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत.

Updated: Dec 31, 2011, 12:51 PM IST

झी २४ तास वेब टीम, इस्लामाबाद

 

पाकिस्तानातील क्वेटा शहरामध्ये शुक्रवारी  सायंकाळी झालेल्या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला असून, २० जण जखमी झाले आहेत. हा स्फोट बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मंत्री नसीर मेंगाल यांच्या घराजवळ एका मोटारीमध्ये स्फोट झाला.

 

दोन वेळा स्फोट झाले, दोन्हीही स्फोट शक्तिशाली होते, अशी माहिती पोलिसांनी एका वृत्तसंस्थेला  दिली. स्फोटात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

या स्फोटामुळे पाकिस्नात घबराहट निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ हा स्फोट झाल्याने घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, स्फोट कोणी घडविला की घडवून आणला याचा शोध पोलीस घेत आहेत.