पाकिस्तानात हिंदूंचा बंद

Updated: Nov 10, 2011, 11:48 AM IST

झी २४ तास वेब टीम, कराची

 

पाकिस्तानातील चाक शहरात सोमवारी झालेल्या तीन हिंदू नागरिकांच्या हत्येच्या निषेधार्थ येथील हिंदू समाजाने बुधवारी सिंध प्रांतात कडकडीत बंद पाळला. या तिघांचे मारेकरी पकडले जात नाहीत, तोवर बंद कायम ठेवण्याचा इशाराही हिंदू संघटनेने दिला आहे.

 
सिंधमधील चाक शहरात चार हिंदू डॉक्टरांची हत्या करण्यात आल्याचे पाकिस्तान हिंदू कौन्सिलने मंगळवारी सांगितले होते. मात्र यापैकी एक जण अद्याप जिंवत असून मृतांमध्ये एक डॉक्टर व त्याचे दोन नातलग यांचा समावेश असल्याचा खुलासा बुधवारी करण्यात आला. जोपर्यंत सर्व मारेकऱ्यांना अटक होत नाही तोवर बंद पाळण्याचा इशारा देत हिंदू समुदायाने सिंधमधील शिकारपूर, लरकाणा, उमरकोट, थरपरकर, नवाबशाह येथे बंद पाळला.