पाकिस्तानचं शहाणपण, कसाबला फाशी द्या!

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला फाशी द्यायला हवी, असं विधान पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी केलंय.

Updated: Nov 10, 2011, 06:23 AM IST

झी २४ तास वेब टीम, इस्लामाबाद

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातला दोषी अजमल कसाबला फाशी द्यायला हवी, असं विधान पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी केलंय.

पाक सरकारच्या या भूमिकेमुळं उशीरा का होईना पण पाकिस्तान सरकारला शहाणपण सुचल्याचं स्पष्ट झालयं. कसाब हा दहशतवादी असल्यानं त्याला फाशीच द्यायला हवी, असं मत मलिक यांनी व्यक्त केलंय. तसंच दहशतवाद हा जागतिक मुद्दा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.