पाकचे राष्ट्रपती हॉस्पीटलमध्ये

पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी अचानक आजारी पडले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने दुबईतील एका हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

Updated: Dec 7, 2011, 12:19 PM IST

झी २४ तास वेब टीम, इस्लामाबाद

 

मेमोगेट प्रकरणी संसदेत एक दिवस आधी भाषण केल्यानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी अचानक आजारी पडले. त्यांच्या छातीत दुखू लागल्याने दुबईतील एका हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

 

ओसामा बिन लादेनच्या खातम्यानंतर झरदारी यांना सत्तापालटेचा फटका बसून शकतो अशी बातम्या काही दिवसांपूर्वी येत होत्या. झरदारी यांनी अमेरिकेला पाठवलेली एक नोट लीक झाल्यानंतर याबाबतचा खुलासा झाला. याप्रकरणी अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत हुसैन हक्कानी यांची त्यांच्या पदावरुन गच्छंती झाली. त्यामुळे झरदारी यांच्यावर काही दिवसांपासून प्रचंड दवाब होता.

 

परंतु झरदारी अचानक छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर दुबईला रवाना झाले. आज त्यांना मेमोगेट प्रकरणात संसदेच्या संयुक्त सत्रात वक्तव्य द्यायचं होतं. मेमोगेट आणि नाटो हल्ल्याचा त्यांच्यावर दबाब असल्याचे सा्ंगण्यात येत आहे.

 

[jwplayer mediaid="11936"]