न्यूयॉर्कमध्ये डेव्हिडची गोल्डन रेप्लिका

रेनासा काळातील मेल ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिडची प्रतिकृती सध्या न्यूयॉर्कच्या नागरिकांचं लक्ष वेधून घेती आहे. जगविख्यात चित्रकार मायकल एंजलो यांच्या डेव्हिडची ३० फूट उंचीची गोल्डन रेप्लिका आहे.

Updated: Mar 9, 2012, 09:32 AM IST

www.24taas.com, न्यू यॉर्क

रेनासा काळातील मेल ब्युटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिडची प्रतिकृती सध्या न्यूयॉर्कच्या नागरिकांचं लक्ष वेधून घेती आहे. जगविख्यात चित्रकार मायकल एंजलो यांच्या डेव्हिडची ३० फूट उंचीची गोल्डन रेप्लिका आहे.

टर्कीश आर्टिस्ट सर्झन ओकाया यांनी ही प्रतिकृती तयार केली आहे.  डेव्हिड इन्स्पायर्ड बाय मायकल एंजलो असं नाव या प्रतिकृतीला देण्यात आलंय. इस्तंबूल ते केंचुकी असा प्रवास करणारा हा स्टॅच्यू सध्या न्यूयॉर्कच्या भेटीवर आहे.

इस्तंबूलमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला. आता जगातल्या वेगवेगळ्या शहरातून प्रवास करत केंचुकीमधल्या २१ सी म्युझियममध्ये हा पुतळा बसवण्यात येणार आहे.