चिंपांझींच्या समुहातही पोलीस दल

समुहात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संघर्ष उदभवू नये यासाठी सक्षम व्यवस्थापन आवश्यक असतं याची जाणीव माणसांप्रमाणेच चिंपांझींमध्ये असते. थोडक्यात काय तर पोलीस यंत्रणेचे महत्व चिंपांझीनाही ठाऊक आहे. संघर्षात निपक्षपाती मध्यस्ती किंवा हस्तक्षेप आवश्यक असतो हे चिंपांझींना माहीती असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

Updated: Mar 8, 2012, 03:53 PM IST

www.24taas.com, वॉशिंगटन

समुहात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संघर्ष उदभवू नये यासाठी सक्षम व्यवस्थापन आवश्यक असतं याची जाणीव माणसांप्रमाणेच चिंपांझींमध्ये असते. थोडक्यात काय तर पोलीस यंत्रणेचे महत्व चिंपांझीनाही ठाऊक आहे. संघर्षात निपक्षपाती मध्यस्ती किंवा हस्तक्षेप आवश्यक असतो हे चिंपांझींना माहीती असल्याचं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

चिंपांझींच्या वर्तणुकीचा अभ्यास झ्युरिचच्या विद्यापीठाने केला आहे. समुहातली शांततेला धोका निर्माण होऊ नये म्हणून वादविवादाच्या निवारणासाठी मध्यस्तांची गरज भासते. संशोधकांनी चिंपांझींच्या चार चमुंच्या वर्तणुकींचे निरिक्षण आणि तुलनात्मक अभ्यास त्यासाठी केला. नवी मादी चिंपांझींच्या चमुत दाखल झाल्यानंतर तसंच नर चिंपांझींचे स्थान नव्याने निश्चित करताना अभ्यास करण्याचा संधी आम्हाला सुदैवाने लाभली असं या अभ्यासकांनी सांगितलं.

नवीन मादी दाखल झाल्यानंतर किंवा नराचे स्थान नव्याने निश्चित करताना चमुचे स्थैर्य डळमळीत होते असं निरिक्षण अभ्यासकांनी नोंदवलं आहे. प्रामुख्याने चमुत उच्च स्थान असेलेले नर किंवा मादी किंवा चमुत आदराचे स्थान असलेल्यांनाच तंटा किंवा संघर्ष सोडवणुकीच्या बाबतीत अधिकार असतो. माणसांप्रमाणेच चिंपांझींमध्येही अधिकार निश्चित केलेले असतात. माणसांप्रमाणेच चिंपाझींमध्येही पोलिसांची भूमिका बजावण्याचे अधिकार काही जणांना बहाल केलेले असतात.

Tags: