नेपाळमध्ये बस अपघात, ३९ मृत्यूमुखी

नेपाळमध्ये रविवारी प्रवाशांना घेऊन जाणारी बस त्रिवेणी नदीत कोसळल्यामुळे किमान ३६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये अधिकांश लोक भारतीय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Updated: Jul 15, 2012, 07:01 PM IST

www.24taas.com, काठमांडू

 

नेपाळमध्ये रविवारी प्रवाशांना घेऊन जाणारी बस त्रिवेणी नदीत कोसळल्यामुळे किमान ३९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये अधिकांश लोक भारतीय असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये ७०-८० हिंदू प्रवासी होते. यातील बहुसंख्य प्रवासी उत्तर प्रदेशातील होते. ही बस दुर्घटना नेपाळची राजधानी काठमांडूपासून २५० किमी अंतरावरील दक्षिण पश्चिमला घडली.

 

बसमधील बहुतांश प्रवासी त्रिवेणीघाटावर होणाऱ्या बोलबम या उत्सवात सहभागी होण्यासाठी चालले होते. यातील जखमी प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं आहे. घटनास्थळावरून आत्तापर्यंत २५ पुरूष, १० स्त्रिया आणि १ मुलाचं शव मिळालं आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.