ड्रोन हल्ला: दहा दहशतवादी ठार

पाकिस्तान अफगाणिस्तानच्या मिरानशाह सीमेवर असलेल्या उत्तर वझिरीस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात दहा संशयित दहशतवादी ठार झाले आहेत.

Updated: Feb 8, 2012, 03:13 PM IST

www.24taas.com,  इस्लामाबाद 

 

 

पाकिस्तान अफगाणिस्तानच्या मिरानशाह  सीमेवर असलेल्या उत्तर वझिरीस्तानमध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात दहा संशयित दहशतवादी ठार झाले आहेत.

 

 

उत्तर वझिरीस्तानमधील एका घरावर अमेरिकेने दोन मिसाईलद्वारे हल्ले केले. या घरांमध्ये दहशतवादी राहत असल्याची माहिती अमेरिकेला मिळाल्यानंतर हा हल्ला चढविण्यात आला. या भागात मोठ्या प्रमाणात दहशतवादी संघटित होऊन काम करत असल्याची माहिती आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये एका विदेशी दहशतवाद्याचाही समावेश आहे, असे हल्ल्यानंतर एका अधिकाऱ्यांने सांगितले.

 

 

दरम्यान, पाकिस्तानमध्ये गेल्यावर्षी अमेरिकेने सुमारे ६४ ड्रोन हल्ले केले आहेत. तर गेल्या आठ वर्षांपासून अमेरिकेकडून पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये एक हजार ७१५ जण ठार झाले आहेत. अमेरिकची व्यवस्था बिघडविणारे, अमेरिकेला लक्ष्य करणारे आणि अमेरिकेसाठी धोका असणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येते, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

 

 

यासंबंधी आणखी बातम्या

 

ड्रोन हल्ले अमेरिकेकडूनच – ओबामा

लादेनच्या घराजवळ रॉकेट हल्ला

नाटो हेलिकॉप्टरला अपघात, सहा ठार

अमेरिकी हल्ल्यात पाकमध्ये चार ठार