झरदारी यांची प्रकृती स्थिर

पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Updated: Dec 8, 2011, 08:10 AM IST

झी २४ तास वेब टीम, इस्लामाबाद 

 

पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. झरदारी यांना काल छातीत दुखू लागल्याने दुबई य़ेथील हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना लंडनमध्ये वैद्यकीय उपचार हलविले होते.

 

राष्ट्राध्यक्षांची नियमित चाचणी करण्यात आली आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत असून, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती झरदारी यांचे खासगी डॉक्टर कर्नल सलमान यांनी असोसिएटेड प्रेस ऑफ पाकिस्तानला माहिती देताना सांगितले.

 

झरदारी यांना सोमवारी रात्री हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मंगळवारी दुबईला उपचारासाठी नेण्यात आले होते. तसेच त्याठिकाणी त्यांनी आपल्या मुलांचीही भेट घेतली. प्रकृतीच्या कारणामुळे झरदारी पदावरून पायउतार होणार अशी चर्चा असताना ती फेटाळण्यात आली होती.