चीनची पहिली महिला अंतराळात झेपावली

चीनची पायलट लियू यांग हि शनिवारी शेमझोऊ - ९ या अंतराळयाना दोन पुरूषांसोबत अंतराळात रवाना झालेली आहे. अंतराळात जाणारी चीनमधील ती पहिला महिला आहे. ती पहिली महिला अंतराळवीर ठरली आहे.

Updated: Jun 16, 2012, 10:38 PM IST

www.24taas.com, बीजिंग 

 

चीनची पायलट लियू यांग हि शनिवारी शेमझोऊ - ९ या अंतराळयाना दोन पुरूषांसोबत अंतराळात रवाना झालेली आहे. अंतराळात जाणारी चीनमधील ती पहिला महिला आहे. ती पहिली महिला अंतराळवीर ठरली आहे. चीनकडून पहिल्यांदाच मानवरहित अंतराळयान  अंतराळात पाठविले आहे जे पृथ्वीभोवती असणार आहे.

 

लियू या महिलेसोबत दोन पुरूष अंतराळवीर देखील आहेत. जे या मिशनसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे हे मिशन सफल झाल्यास चीन अमेरिका आणि रशिया नंतर अशी गोष्ट साध्य करणारा तिसरा देश ठरणार आहे. लियू ला अंतराळात पाठविल्यानंतर महिला अंतराळात पाठविणारा तिसरा देश चीन झाला आहे.

 

अनेक कठिण स्पर्धेनंतर मी या अंतराळ उड्डाणासाठी निवडण्यात आली यांचा फार आनंद आहे. अशी भावना व्यक्त केली आहे ती लियू या पहिल्या चीनी अंतराळवीर महिलेने. मी अंतराळातून परत येताना माझं आयुष्य नक्कीच बदलेलं असेल अशी अपेक्षा करते. असा विश्वास तिने व्यक्त केला आहे.