गिलानींविरोधातील सुनावणी १ फेब्रुवारीला

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यावरील सुनावणी आज संपली. पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला होणार आहे.

Updated: Jan 19, 2012, 01:17 PM IST

www.24taas.com , इस्लामाबाद

 

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांच्यावरील सुनावणी आज संपली. पुढील सुनावणी १ फेब्रुवारीला होणार आहे.

 

 

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांना आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. मेमोगेट प्रकरण आणि झरदारींवरील घोटाळ्यांच्या आरोपांबाबत कारवाई न केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं गिलानींना अवमानाची नोटीस बजावली होती. त्यामुळे पाकिस्तनात पुन्हा एकदा कोर्ट विरूद्ध पार्लामेंट असं चित्र पहायला मिळाले.

 

 

पुढील सुनावणीच्यावेळी गिलानी हे उपस्थित राहिले नाहीत तरी चालू शकणार आहे. १० मिनिटे गिलानी यांनी आपली बाजू मांडली. यावेळी न्यायालयाचा आपण सन्मान करतो, असे सांगितले. गिलानी यांच्याबरोबर पाकिस्तान पिपल पार्टीचे काही नेतेही न्यायालयात उपस्थित होते.