ZEE MEDIA चे रिपोर्टर शिवम भट्ट यांचे अपघातात निधन

Updated: Nov 20, 2014, 01:38 PM IST
ZEE MEDIA चे रिपोर्टर शिवम भट्ट यांचे अपघातात निधन title=

कैथल/नवी दिल्ली:  हरियाणाच्या कैथलमध्ये कुलतारण गावाजवळ झालेल्या अपघातात झी मीडियाचे पत्रकार शिवम भट्ट यांचे निधन झाले. या दुर्घटनेत झी मीडियाचे दोन सहयोगी रोहित खन्ना आणि जसवीर जखमी झाले आहे. या अपघातात ड्रायव्हरही जखमी झाला आहे. अपघात हिस्सारहून चंदीगड जात असताना झाला. 

बातमीचे वार्तांकन करताना झी न्यूज चॅनलची टीम बाबा रामपालच्या अम्बुलन्ससोबत  पोलिसांच्या ताफ्याच्या मागे जात होते त्यावेळी हा अपघात घडला. रामपालला काल रात्री बरवाला येथून अटक करण्यात आली होती. त्याला पंचकुला येथे घेऊन जात होते. २४ वर्षीय शिवम यांच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ आहे. 
शिवमच्या आकस्मिक निधनाबद्दल हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शोक व्यक्त केला. 
शिवम भट्ट यांच्या आत्माला शांती लाभो अशी देवा चरणी प्रार्थना...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.