रायपूर : गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी चक्क बिल्डिंगवर चढून जाणाऱ्या हिरोचे सीन्स आपण अनेक चित्रपटात पाहिले असतील मात्र असा सीन्स प्रत्यक्षात करणे एका तरुणाच्या जीवावर बेतलेय.
आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाच्या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना रायपूरच्या राजतलाब परिसरात घडलीये.
रशीद अली असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बिल्डिंगच्या मागच्या बाजूने पाईपनेच्या सहाय्याने तिसऱ्या मजल्यावर चढला. मात्र तोल गेल्याने तो खाली कोसळला. त्याला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, मुलीच्या नातेवाईकांनीच आपल्या मुलाला तिसऱ्या मजल्यावरुन ढकलल्याचा आरोप तरुणाच्या घरच्यांनी केलाय. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.