योगी आदित्यनाथ यांचा गुंडांना इशारा

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील गुंडांना इशारा दिलाय. उत्तरप्रदेश सोडून जाण्यासाठी सज्जड दमच त्यांनी गुंडांना भरलाय. 

Updated: Mar 26, 2017, 09:54 PM IST
योगी आदित्यनाथ यांचा गुंडांना इशारा title=

लखनऊ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील गुंडांना इशारा दिलाय. उत्तरप्रदेश सोडून जाण्यासाठी सज्जड दमच त्यांनी गुंडांना भरलाय. 

दोन महिन्यात तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील असा इशारा त्यांनी गुंडांना दिलाय. त्याचबरोबर त्यांनी सरकारी अधिका-यांनाही खडे बोल सुनावलेत. रोज 18 ते 20 तास काम करणार असल्यामुळे भ्रमात न राहण्याचा सल्ला त्यांनी अधिका-यांना दिला. तसेच कामात अडचणी आणणा-या अधिका-यांची खैर केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

उत्तरप्रदेशला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी योग्य ते सर्व प्रयत्न केले जातील असं त्यांनी यावेळी सांगितलं. 15 जूनपर्यंत खड्डेमुक्त उत्तरप्रदेशासह लवकरच 24 तास वीज उपलब्ध होईल असंही आश्वासन दिलं. यावेळी त्यांनी नेत्यांना सरकारी ठेकेदारीपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला.