भारताच्या सीमा होणार सील

भारत आणि बांगलादेश तसंच भारत आणि पाकिस्तान या सीमा लवकरच सील करण्यात येणार आहेत.

Updated: Mar 26, 2017, 08:55 PM IST
भारताच्या सीमा होणार सील title=

ग्वाल्हेर : भारत आणि बांगलादेश तसंच भारत आणि पाकिस्तान या सीमा लवकरच सील करण्यात येणार आहेत. सीमेपलीकडून होणारी घुसखोरी टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलीय.

सीमेच्या बहुतांश भागात कुंपण घातलं जाईल, जिथं कुंपण घालणं शक्य नसेल तिथे तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येईल अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिलीय. ग्वाल्हेरच्या टेकनपूरमध्ये बीएसएफची पासिंग आऊट परेड पार पडली. यावेळी राजनाथ सिंह सहभागी झाले होते. यावेळी बीएसएफच्या जवानांचं राजनाथ यांनी कौतुक केलं.

गेल्या अडीच तीन वर्षात नक्षलवादी हल्ल्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलंय. राज्य सरकार व्यवस्थित जबाबदा-या पार पाडत असून केंद्राकडून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.