नवी दिल्ली : आम आदमी पार्टीमध्ये फूट पडली असून प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्रा. आनंद कुमार, आनंद झा या नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, बैठकीत हाणामारी झाल्याचे भूषण यांनी म्हटले आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय बैठकीतून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल झालेल्या गोंधळानंतर बैठकीतून निघून गेलेत. तसेच बैठकीय घेण्यात आलेल्या मतदानाच्यावेळी बोगस मतदान झाले.पक्षाच्या लोकपालला बैठकीत येऊ देले नाही, असा आरोप करुन बैठकीत धक्काबुक्की, मारामारी झाल्याचा दावा भूषण यांनी केला आहे. त्याचवेळी मलाही मारहाण करण्यात आल्याचे ते म्हणाले. हा लोकशाची खून आहे. लोकशाहीची गळचेपी केली गेली आहे, असे मीडियासमोर भूषण यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना पार्टीतून बाहेर काढलं जाण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती. मात्र, त्यांच्यासह अन्य दोघांची हकालपट्टी कऱण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार आजच्या बैठकीत दोन वेगवेगळे प्रस्ताव मांडले जाणार होते. ज्यांत पहिला प्रस्ताव हा प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्याचा असेल, तर दुसरा प्रस्ताव त्यांची पार्टीतून हकालपट्टी करण्याचा होता. बैठकीत दुसऱ्या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, बैठकीच्यावेळी या दोन नेत्यांसह अनेकांचे मोबाईल काढून घेण्यात आले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.