मोदी सरकारवर केलेल्या वक्तव्यावर यशवंत सिन्हांचा युटर्न

'मोदी सरकारची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली नसल्याचा स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी दिलंय. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा यशवंत सिन्हा यांनी केलाय.

Updated: Jan 31, 2016, 11:22 PM IST
मोदी सरकारवर केलेल्या वक्तव्यावर यशवंत सिन्हांचा युटर्न title=

नवी दिल्ली : 'मोदी सरकारची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली नसल्याचा स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी दिलंय. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा यशवंत सिन्हा यांनी केलाय.

एका कॉलेजमध्ये डिफिकल्ट डायलॉग या कार्यक्रमात सिन्हा यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिल्याचं बोललं जात होतं. मोदी सरकारचा जनतेसह कोणताही संवाद होत नसल्यानं त्यांची अवस्था माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारप्रमाणे होईल असं विधान सिन्हा यांनी केल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं. त्यावर सिन्हा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.