नवी दिल्ली : मतदान यंत्रांना काँग्रेसच्या खासदारांनी केलेला विरोध चुकीचा असल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते वीरप्पा मोईलींनी केलंय. पक्षविरोधी भूमिका मांडल्यानं मोईलींना काँग्रेसनं समन्स बजवाण्यात आलंय.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमधील फेरफार केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी सीपीआयचे महासचिव डी राजा आणि इतर नेत्यांचा समावेश होता. पुढच्या काळात निवडणूक आयोगानं यावर योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी शिष्टमंडळानं राष्ट्रपतींकडे केली.