'स्कूपव्हूप'च्या सह-संस्थापकावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल

'स्कूपव्हूप'नावाच्या वेबसाईटचा सह-संस्थापक सुपर्ण पांडेय याच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय. 

Updated: Apr 12, 2017, 08:34 PM IST
'स्कूपव्हूप'च्या सह-संस्थापकावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल  title=

नवी दिल्ली : 'स्कूपव्हूप'नावाच्या वेबसाईटचा सह-संस्थापक सुपर्ण पांडेय याच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय. 

याच कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेनं पांडेय याच्याविरोधात एफआयआर दाखल केलंय. गलिच्छ शब्द वापरूनच नाही तर ऑफिशिअल ई-मेलवरही अश्लील मॅसेजेस पाठवण्यात आल्याचं या महिलेनं म्हटलंय. 
 
सुपर्ण याच्यासोबतच इतर सह-संस्थापकांवरही अशा घटनांना प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आलाय. हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं सांगत या महिलेनं त्यांचं नावही एफआयआरमध्ये दाखल केलंय. 

'स्कूपव्हूप'मध्ये सीनिअर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलेल्या या महिलेनं छळाला कंटाळून वसंत कुंज पोलीस स्टेशन गाठलं. आरोपींवर कलम ३५४ ए, कलम ५०९ आणि कलम ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.