नवी दिल्ली : जनधन खात्यातून पैसे काढून घ्यायला मर्यादा घालण्यात आल्या आहेत. केवायसी असणाऱ्यांना १० हजार रुपये तर नॉन केवायसीधारकांना ५ हजार रुपये काढता येणार आहेत.
जनधन योजनेअंतर्गत खाते असलेल्या खातेदारांना आता अंकाँऊटमधून महिन्याला दहा हजार रुपये काढता येतील अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलीय. मात्र ही वाढीव रक्कम केवायसी पूर्ण असलेल्या खातेदारांनाच काढता येणार आहे. केवायसी पूर्ण नसलेल्या खातेदारांना महिन्याकाठी फक्त पाच हजार रुपये काढता येणार आहेत.
दरम्यान, 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी अथवा बदलण्यासाठीची अंतिम मुदत कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नसल्याचे वृत्त आहे. रिझर्व्ह बँक आणि देशभरातील अन्य बँकांकडे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे जुन्या नोटा जमा करण्याची किंवा त्या बदलून घेण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची कोणतीही शक्यता नाही.