'मी संघाच्या विचारसरणीचे समर्थन करतो असे नाही'

दिल्लीत रविवारी  संघाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय सेवा भारती' या कार्यक्रमात अझीम प्रेमजी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने बरीच खळबळ माजली होती. 

Updated: Apr 6, 2015, 10:04 PM IST
'मी संघाच्या विचारसरणीचे समर्थन करतो असे नाही' title=

नवी दिल्ली : दिल्लीत रविवारी  संघाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय सेवा भारती' या कार्यक्रमात अझीम प्रेमजी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने बरीच खळबळ माजली होती. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहिलो म्हणजे मी संघाच्या विचारसरणीचे समर्थन करतो असे नाही, असे विप्रो ग्रुपचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी स्पष्ट केले. 

प्रेमजी यांना संघ विचारसरणी मान्य असल्याची चर्चाही या निमित्ताने सुरू झाली होती. मात्र अझीम प्रेमजी यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

'सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या संस्थांना पाठबळ मिळावे म्हणून मी त्या कार्यक्रमास उपस्थित होतो, मात्र त्याचा वेगळा अर्थ लावला गेला. संघाच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी होत आहात म्हणजे तुम्हाला संघाची विचारसरणी मान्य आहे, असे काही जण मला म्हणत होते. 

पण फक्त एखाद्या व्यासपीठावरून बोलण्यामुळे, तेथे हजर राहिल्यामुळे तुम्हाला त्या व्यासपीठावर मांडण्यात आलेले सर्व विचार मान्य आहेत असे होत नाही. मी संघाच्या विचारसरणीचे समर्थन करत नाही, ' असे प्रेमजी यानी स्पष्ट केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.