'...तर विमानतळावर जाऊन मीच माझं नाव हटवेल'

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांचं नाव विमानतळावरच्या व्हीव्हीआयपी लोकांच्या यादीत असल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यावर पहिल्यांदाच वडेरा यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Updated: Sep 15, 2015, 03:48 PM IST
'...तर विमानतळावर जाऊन मीच माझं नाव हटवेल' title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा यांचं नाव विमानतळावरच्या व्हीव्हीआयपी लोकांच्या यादीत असल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यावर पहिल्यांदाच वडेरा यांनी प्रतिक्रिया दिलीय.

काँग्रेस सरकारच्या काळात बिना चौकशी विमानतळावर प्रवेश करणाऱ्या व्हीव्हीआयपी लोकांच्या यादीत सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वडेरा यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. पण, हे नाव हटवण्यासाठी आपण स्वत: जाण्यास तयार असल्याचं वडेरा यांनी म्हटलंय. 

मोदी सरकारकडे वारंवार विनंती करूनही माझं नाव या यादीतून हटवण्यात आलेलं नाही. जर सरकारने हे नाव हटवलं नाही तर आपल्याला स्वत: जाऊन नावावर पांढरी पट्टी लावून हे नाव मिटवावं लागेल, असं रॉबर्ट वडेरा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

आपण काही कोणी व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी व्यक्ती नाही त्यामुळे आपलं नाव या यादीतून हटवण्यात यावं, असं वडेरा यांचं म्हणणं आहे.

यादरम्यान नागरिक उड्डाण मंत्री महेश शर्मा यांनी मात्र, वडेरा यांनी ही आपली मागणी लिखित स्वरुपात सरकारकडे द्यावी... त्यानंतर त्यांचं नाव व्हीव्हीआयपी यादीतून वगळण्यात येईल, पण, वडेरा यांच्याकडून अद्याप कोणतीही मागणी लिखित स्वरुपात मिळालेली नाही, असं म्हटलंय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.